शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान


दर्यापूर ग्रामीण प्रतिनिधी दिपक मेश्राम 

आठवडा तिसरा | दिवस दुसरा | विधानभवन, मुंबई

विधीमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज, दि. ०७/०७/२०२६ रोजी विधानभवनात प्रतिक्रिया देताना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये निर्माण झालेल्या शिक्षकांच्या गंभीर कमतरतेचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. दर्जेदार शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत असून त्यांच्या भविष्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पालक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

या वरील संदर्भात काही दिवसांपूर्वी आमदार मा. श्री. गजाननभाऊ लवटे यांनी शिक्षक मंत्र्यांकडे निवेदन सादर करून या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते.

यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार गजाननभाऊ लवटे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे हा अधिकार बाधित होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे, शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन दर्यापूर व अंजनगाव सुर्जी मतदारसंघातील ग्रामीण शाळांमध्ये आवश्यक त्या शिक्षकांची त्वरित भरती करावी.

तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे शिक्षकांच्या अभावामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात जाऊ देणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी मी कटिबद्ध आहे. 

या प्रश्नावर आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी नमूद करत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली.....

No comments:

Post a Comment