पोलिस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा
२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल; १ लाख १० हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि आखाडा बाळापूर पोलिसांनी सोमवारी उशिरा आखाडा बाळापूर-येरीकेशन मार्गावरील एका बारच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १० हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी १९ आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे भुजंग कोकरे, हरिभाऊ गुंजकर, चालक हराळ तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बिट प्रमुख गजानन राठोड, परमेश्वर सरकटे आणि चालक प्रवीण चव्हाण
यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी हरिभाऊ गुंजकर यांच्या फिर्यादीवरून शेख मुनीर शेख अमीर, निखिल सुभाष बंडेवार, शेख सलमान शेख गफार, कैलास वैजनाथ क्षीरसागर, सुनील शिवराम पोटे, मजहर लतीफ शेख, शेख जाकेर शेख युसुफ, सुरेश राजू भडंगे, राजेश नागोराव पाटेकर, साजीद मुनीर खान पठाण, गणेश प्रताप पवार, ऋषिकेश चांदेश्वर उपरे, कपिल कोंडबाराव सारेवार, अनिल संभाजी काशिदे, अविनाश देवीदास बोंढारे, हरूण इसाक सय्यद, भारत रमाजी पाईकराव, भगवान विलास बोंढारे, इरफान जमील कुरेशी आणि शेख सलीम शेख वलीसाब या २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख गजानन राठोड करीत आहेत.

No comments:
Post a Comment