अर्नाळा येथे भाकपचे मोठ्या संख्येने जेलभरो आंदोलन



दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष  ठाकरे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 10 ऑगस्ट रोजी अर्नाळा पोलीस स्टेशनमधे मोठ्या प्रमाणावर जेलभरो आंदोलन आयोजित केले. आंदोलनाचे प्रमुख कारण कामगारविरोधी कायदे, आशा सेविकांच्या वेतन‑वकामाच्या मागण्या आणि स्थानिक पातळीवरचे विविध समस्यांकडे लक्ष वेधणे राहिले. लाल बावट्याचे शेकडो युवक, शेतकरी आणि कामगारांनी संघटित स्वरूपात भाग घेऊन पोलीस

ह्या दरम्यान शेकडो कार्यकर्ते व नागरिकांसमवेत हे आंदोलन वसई तालुका सेक्रेटरी कॉ. अनिरूध्द मेहेर, तालुका सह सेक्रेटरी कॉ. अंकुश खरपडे व कॉ. पार्वती पाडेकर काॅ. सुचिता चव्हाण काॅ.भारती जाधव, काॅ.आरती वांगड,  यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. जिल्हा कौशिल सदस्य कॉ. शेरू वाघ व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थितीही होती. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारांविरुद्ध जोरदार घोषणा केल्या आणि त्वरित कामगारविरोधी कायदे मागे घेण्याचे, आशा सेविकांचे वेतन व कामाच्या अटी सुधारण्याच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी ठाम मागणी केली. हे सरकार पोलीस दडपशाही च्या माध्यमातून वाढवण बंदर सारखे विनाशकारी प्रकल्प आणुन स्थानिकांना देशो धडीला लावत असल्याचे काॅ शेरू वाघ ह्यांनी सांगितले  आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी  चळवळीची गाणी गात जनसामान्यांचे लक्ष वेधले.ऐक तासानंतर सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली


No comments:

Post a Comment