क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीचे अवच्युत साधून चिमुकल्यांच्या वाढदिवसा निमित्त फळे, बिस्कीट पाणी वाटप,
प्रतीनिधी गजानन चव्हाण
श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा व सहायता हेल्प,सपोर्ट ग्रुप मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यक्रांतिकारक, क्रांतीगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या 232.व्या जयंती निमित्तचे अवच्युत साधून चि.श्रेयश गजानन चव्हाण, कु. सहेरीश शाहिद चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त , लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे रुग्णांना फळे, बिस्कीट, व पाणी वाटप कार्यक्रम व प्रेरणादायी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवर, युवक, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखन मिलादें (नगरसेवक) होते, तर प्रमुख पाहुणे मूर्तिजापूर स्वच्छता अभियानचे सर्वेसर्वां सत्यनारायण तिवारी रुग्णसेवक रवि माडकर, रुग्णसेवक रामदास हटकर, मधुकर इंगोले समाज सेवक,बाळासाहेब खाडेकर समाजसेवक हे उपस्थित होते. यावेळी, सुनील भोजगडिया, सोहन सरोवरे, रवि चव्हाण, रमेश दर्यानी, दिनेश श्रीवास, इम्रानभाई, मुन्ना श्रीवास,प्रवीण भाई ढगे, पिंकू शर्मा रुग्णसेवक तुषार जंगले (शिवण) सुनील खंडारे, जानराव गवई, प्रकाश आमटे,अब्दुल रफिक. अब्दुल रहीस .अजय श्रीवास,बाळासाहेब खांडेकर,रफिकभाई, सुनील मालखेडे, पत्रकार रुपाली खडसे, पत्रकार श्याम राजे, पत्रकार प्रतीक कुरेकर, सौ.प्रियंका चव्हाण,आशिष कानडे, चैतन्य खेडकर यांच्यासह अनेक नागरिक, युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि देशभक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन युवकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश या अभिवादन कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी गजानन चव्हाण आणि शाहिद चाऊस यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक विष्णू लोडम यांनी तर श्री आईबाबा बहूउद्देशीय संस्था सालतवाडा चे अध्यक्ष श्री गजानन चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:
Post a Comment