भांडगाव म्हसोबा देवस्थान ट्रस्टवर पशुहत्या व अवैध दारू विक्रीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी
इंदापूर, — मौजे भांडगाव येथील म्हसोबा देवस्थान ट्रस्टविरुद्ध स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनी गंभीर तक्रार नोंदवली आहे. ग्रामसभा निर्णय, कलेक्टर व न्यायालयांचे आदेश असूनही देवस्थानाच्या सभोवताल व शेजारील नदी पात्रात जिवंत प्राण्यांचे बलिदान (पशुहत्या) चालू असून मंदिर परिसरात अवैध दारू विक्रीही सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
सचिन भिमराव गायकवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार, भांडगाव म्हसोबा देवस्थान ट्रस्टने ग्रामसभेचा निर्णय आणि न्यायालयीन तसेच कलेक्टरांचे आदेश पाळलेले नाहीत. या अनुचित कृत्यामुळे स्थानिक जनता व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून सार्वजनिक आरोग्य व शांततेलाही धोका निर्माण झाला आहे.ग्रामस्थांनी आणि तक्रारदारांनी मागणी केली आहे की:भांडगाव म्हसोबा देवस्थान ट्रस्टवरील तत्काळ चौकशी करून गुन्हा नोंदवावा.
मंदिर परिसरात व शेजारील नदी पात्रात ज्या प्रकारचे जिवंत प्राण्याचे बलिदान व अवैध दारू विक्री चालू आहेत ती तात्काळ थांबवावी.ग्रामसभेचा ठराव, कलेक्टर व न्यायालयाचे आधीचे आदेश अंमलबजावणीस लावले जावेत.दोषींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी प्रथा प्रतिबंध व उच्चाटन कायदा, 2013 आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कारवाई करावी.
सचिन गायकवाड हे 1 जुलै 2026 पासून तहसीलदार (इंदापूर) कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनात बसून आहेत आणि प्रशासनाकडून तातडीची कारवाई अपेक्षित आहे.स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना विनंती करण्यात येत आहे की हे प्रकरण गंभीरतेने घेऊन ताबडतोब आवश्यक तपास आणि अंमलबजावणी करावी. स्थानिक नागरिक तसेच ग्रामसभा यांनी शांततेने आणि कायद्याच्या मार्गाने वागण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पुणे जिल्हा महासचिव आयु. सचिन भीमराव गायकवाड, आयु. राहुल सोनवणे, पीपल रिपब्लिकन पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष आयु. सुनील सोनवणे, शिवश्री न्यूजचे संपादक आयु. भीमराव शिंदे, आयु.सागर चंदनशिवे, आयु. तुषार भोसले,आयु.नारायण मिसाळ श्रीमती मनीषा चंदनशिवे, श्रीमती ज्योतीताई चव्हाण, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment