आ.बच्चू कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा हार तुरे न स्वीकारता शालेय वास्तू भेट म्हणून सामाजिक उपक्रमांचे स्वागत
प्रतिनिधी / . गणेश ठाकरे (नाशिक) अमरावती
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी४५११ चे राज्याध्यक्ष शिवसेना पक्षाचे लोकप्रिय आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस आज संपूर्ण राज्यभरात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘रुग्णांचा देवदूत’ आणि ‘सामान्यांचा नेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता शालेय वास्तू भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.यातून सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे त्यांनी सांगितले.
🩸 भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिरे
वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामपंचायत कर्मचारी व इतर संघटना चे शेकडो तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलन संत गाडगे बाबा रक्तपेढी अमरावती यांनी विशेष सहकार्य केले.
🌱 पर्यावरण रक्षणाचा संदेश
कार्यकर्त्यांनी केवळ केक न काटता विविध गावांमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. तसेच, गरजूंना शैक्षणिक साहित्य आणि सायकलींचे वाटप करण्यात आले.
नेत्यांची व कार्यकर्त्यांची रीघ
बच्चूभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची, दिव्यांग बांधवांची आणि विविध राजकीय क्षेत्रांतील नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

No comments:
Post a Comment