बिरोबा देवस्थान, काळेवाडी (पळसदेव) येथे नवीन सभामंडपाच्या बांधकामासाठी ३० लाखांचा निधी; भूमिपूजनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद
इंदापूर प्रतिनिधी :-अंकुश भोसले
पळसदेव (ता. इंदापूर): इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नं. १, पळसदेव येथील श्री बिरोबा देवस्थान परिसरात नियोजित असलेल्या नवीन भव्य सभामंडपाच्या बांधकामासाठी कृषीमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय (मामा) विठोबा भरणे यांनी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या सभामंडपाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री बिरोबा मंदिर, काळेवाडी नं. १, पळसदेव येथे करण्यात आले आहे.
पळसदेव हे भीमा नदीकाठचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे गाव असून येथील श्री पळसनाथ मंदिर हे परिसरातील प्रमुख श्रद्धास्थान आहे. या पार्श्वभूमीवर श्री बिरोबा देवस्थानात होणारा नवीन सभामंडप भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम व विविध उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
*कृषिमंत्री व आमदारांच्या निधीला आभार*
श्री बिरोबा देवस्थानाच्या वतीने कृषिमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे(मामा) यांनी सभामंडपाच्या बांधकामासाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल देवस्थान प्रशासन, ग्रामस्थ व भाविकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. या निधीमुळे देवस्थान परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सभामंडपाचे बांधकाम व्यवस्थित पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा)यांच्या शुभहस्ते या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन होणार असून, त्यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे, सदस्य, पंचायत समिती इंदापूर, यांचीही उपस्थिती राहणार आहे.
*प्रमुख पाहुणे व उपस्थिती*
भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई दीपक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूरचे अध्यक्ष हनुमंतराव आबा कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य श्री.हनुमंतराव लक्ष्मण बनसुडे, माजी सरपंच सौ. इंद्रायणी सुजित मोरे, पळसनाथ ट्रस्टचे सचिव श्री.योगिराज गणपत काळे, कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक श्री.मधुकर विठोबा भरणे, पंचायत समिती सदस्या सौ. कीर्तीताई प्रवीण काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रतापराव गणपतराव पाटील तसेच माजी सभापती सौ. सारिकाताई हिराचंद काळे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाळासाहेब काळे, माजी सरपंच आजिनाथ भगवान पवार, प्रशासक सौ. कोमल सुभाष बनसुडे,माजी सरपंच श्री नवनाथ अनंता काळे, माजी सरपंच श्री.संतोष लक्ष्मण काळे, माजी उपसरपंच श्री.तुळशिराम मारुती काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.स्वप्निल संपत काळे व सौ. दिपाली महेंद्र काळे, सेवानिवृत्त अधिकारी श्री.गणपतराव काळे, श्री.रामदास चव्हाण, श्री.अर्जुनराव गांधले तसेच जेष्ठ पत्रकार श्री.तानाजी काळे उपस्थित राहणार आहेत.
तसेच पळसदेव पंचक्रोशीतील विविध देवस्थानांचे पुजारी, अधिकारी, पदाधिकारी आणि भाविक भक्तगण या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
*देवस्थानाचा विकास*
श्री बिरोबा देवस्थानात नवीन सभामंडप उभारल्याने येथे होणाऱ्या धार्मिक उत्सवांना, भजन-कीर्तनांना, सामूहिक उपक्रमांना व ग्रामस्तरीय कार्यक्रमांना योग्य व्यवस्थापनाची सुविधा मिळणार आहे. बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत असून त्याच्या देवस्थानांना महाराष्ट्रात मोठी भक्तिपरंपरा लाभलेली आहे.
देवस्थानाच्या वतीने सर्व भाविकांना, ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना या भूमिपूजन समारंभास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment