वाळुंज ZP–PS निवडणुकीची रणधुमाळी सुरू! तिकीट कुणाला? ‘चेहरा’ ठरणार निर्णायक



वाळुंज (प्रतिनिधी): प्रति. पांडुरंग गायकवाड दैनिक दर्पन वृत सेवा) वाळुंज परिसरात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. अनेक इच्छुकांनी तर डोक्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून, गावागावात चर्चेला उधाण आले आहे.

पण खरी खेळी अजून बाकी आहे…

कारण यावेळी निवडणूक फक्त पक्षावर नाही, तर तिकीट मिळालेला उमेदवार कोण? यावरच विजयाचे गणित ठरणार असल्याची स्पष्ट चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.

वाळुंजमध्ये प्रतिष्ठेची लढाई; दोन दिवसांत चित्र स्पष्ट!

वाळूज परिसरात यंदा अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची लढाई होणार असल्याचे संकेत आहेत. पुढील दोन दिवसांत राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कुणाला उमेदवारी, कुणाला डच्चू, आणि कुणाच्या गळ्यात माळ… हे ठरणार आहे.

प्रशांत बंब विरुद्ध सतीश चव्हाण? ‘दोन दिग्गजांचे’ वजन एकाच मैदानातया निवडणुकीत गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे दोन्ही दिग्गज आमदार आपापले उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे वाळुंजची निवडणूक ही आता केवळ स्थानिक राहिलेली नाही, तर दोन आमदारांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालली आहे.

‘पक्ष कोणताही असो… पण उमेदवार योग्य हवा!’ जनतेचा सूर बदलतोययावेळी मतदारांचा सूर स्पष्ट आहे—पक्ष कोणताही असो, पण उमेदवार कामाचा आणि लोकांमध्ये मानाचा हवा!लोक म्हणतात की यंदा जात-पात, गट-तट आणि झेंडे बाजूला ठेवून काम करणाऱ्या उमेदवारालाच साथ दिली जाणार.

तिकीटावरून जोरदार लॉबींग; आतल्या गाठीभेटीला वेग

सध्या वाळुंज परिसरात तिकिटासाठी जोरदार लॉबींग, गाठीभेटी आणि चर्चा सुरू असून काही इच्छुक तर अंतिम क्षणापर्यंत तिकीट मिळवण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अनेकांनी प्रचाराची तयारी सुरू केली असली तरी तुम्हाला तिकीट मिळणार की नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. 

 One attachment

  •  Scanned by Gmail


No comments:

Post a Comment