सख्या मामी कडून अल्पवयीन भाषा वरती लैंगिक अत्याचार निर्लज्य पणाचा कळस गाठला



)दैनिक दर्पण प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड 



 सदरील प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या निधनानंतर हा अल्पवयीन मुलगा शिक्षणासाठी व राहण्यासाठी आपल्या मामाकडे आला होता. मात्र, मामाच्या अनुपस्थितीत मामीने त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तक्रारीनुसार, मार्च २०२३ मध्ये मामीने मुलाला बेडरूममध्ये बोलावून घेतले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने मुलाला सतत धमकावले की, "कोणाला सांगितलंस तर खोट्या केसमध्ये अडकवीन" तसेच घराबाहेर हाकलून देईन असे ब्लॅकमेल केले. ारी

मामी मुलाला नको त्या ठिकाणी स्पर्श करणे, मुद्दाम मिठी मारणे आणि थेट शरीरसुखाची मागणी करून भाग पाडणे असे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून करत होती. मामा कामावर गेल्यावरच हे अत्याचार सुरू होत असल्याचे पीडिताने तक्रारीत सांगितले आहे.

एक दिवस मामाला हा सर्व प्रकार समजल्यानंतर, पीडित मुलगा आणि त्याच्या मामाने एकत्रितपणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी महिलेवर पोक्सो कायदा आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. सध्या पोलिस पुढील तपास करत असून, न्यायालयाने आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला फेटाळून तिची अटक कायम ठेवली आहे.या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक नात्यात विश्वासघाताबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 


No comments:

Post a Comment