जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 येणेगुर जिल्हा परिषद गटांसाठी उबाठा पक्षांची प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न




 प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी 

दिनांक 08/01/2026 रोजी रात्री 8 :30 वाजता येणेगुर गावात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीच्या अनुषंगाने येणेगुर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व उमेदवार चाचपणी करण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे लाडके आमदार श्री प्रवीण स्वामी गुरुजी व तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते केशव उर्फ बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटाची बैठक घेण्यात आली या बैठकीत ठाकरे गटाचे धगधगती तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुधाकर पाटील साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व उमरगा लोहारा तालुक्याचे लाडके आमदार साहेबांनी ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येणेगुर जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे व येणेगुर पंचायत समिती गण ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे व तुगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव असुन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून उत्कृष्ट आसे उमेदवारांची नावे 2.दिवसात जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी सुचवायचे आहे व आपण दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सुरुवात तालुक्याचे लाडके नेते श्री केशव उर्फ बाबा पाटील यांचे सत्कार, व तालुक्याचे लाडके आमदार श्री प्रवीण स्वामी गुरुजी यांचे सत्कार करण्यात आला व जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार जी नागणे साहेब ,व सुधाकर पाटील साहेब  ,येणेगुर जिल्हा परिषद गटाचे गटप्रमुख श्री अण्णाराव माने साहेब, या सर्वच उपस्थित नेत्यांचे सत्कार करण्यात आले 

या बैठकीत येणेगुर गावाचे मा, सरपंच आयुब जवळगे,मा, उपसरपंच व जेष्ठ नेते बाबुराव स्वामी, दिलीप बनसोडे, जेष्ठ शिवसैनिक दिलीप संगशेट्टी,सुक्शेन ईगवे,अस्लम जमादार,नागनाथ दाम शेट्टी,महेश माने, सतिष जाधव, सिध्देश्वर बिराजदार, गजानन गावकरे, रमेश बनसोडे, युवा सैनिक राहुल लामजने, प्रविण दुधभाते, प्रकाश कलशेट्टी, अविनाश स्वामी,व बैठकीसाठी कोराळ,गावातील अण्णाराव माने, आकाश शर्मा, व इतर,महालिगरायवाडी, गावातील बाबुशा रामतीर्थे ,व इतर,सुपतगाव, गावातील नागनाथ शिंदे,व इतर,दामवाडी गावातील अजय कवठे, सचिन जमादार,लव्हु जमादार, अविनाश जमादार, तुळशीदास जमादार, तुगाव गावातील विश्वजीत माने,व इतर,अनेक जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते,


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उमरगा तालुका उपाध्यक्ष श्री संतोष दादा कलशेट्टी यांनी केले व या कार्यक्रमासाठी गटातील व गणातील उपस्थित कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी यांनी आभार मानले,

No comments:

Post a Comment