प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून प्रा. शरदचंद्र डोंगरे यांचे कौतुक
महागाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य गरजू व गरीब लाभार्थ्यांचे सन 2018 पासून आज पर्यंत रखडलेले अनुदान मिळवून देण्यासाठी प्रा. शरदचंद्र डोंगरे यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन सातत्यपूर्ण पाठपुरावा व सामाजिक बांधिलकी अत्यंत प्रेरणादायी आहे लाभार्थ्याच्या अडचणी समजून घेऊन लाभार्थ्याच्या वतीने पुढाकार घेत संबंधित विभागाशी सातत्याने संपर्क साधाला लाभार्थ्याच्या समस्या शासनाच्या निर्देशनात आणून देत वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेला40,000 हजाराचा शेवटचा हप्ता आज रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. शरदचंद्र डोंगरे यांनी लाभार्थ्याचे प्रश्नन शासन दरबारी प्रभावी पणे मांडण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सन 2018 पासून ते आज पर्यंत घरकुल लाभार्थ्याच्या हितासाठी झटत आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे आज रोजी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्या ना बँक खात्यात शेवटचा 40,000 हजारांचा हप्ता टाकण्यात आला, त्यांच्या केलेल्या या कार्याबद्दल आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ऋणी आहोत व तसेच आमदार श्री. किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना साहेब, तहसीलदार श्री अभय मस्के साहेब न.प. मुख्याधिकारी श्री अजय कुरवाडे साहेब, कर्मचारी कुलदीप राजनकर, श्री शेख नजीब, सी, एल, टी, सी, उमरखेड यांनी अथक परिसरात घेऊन घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्नन मार्गी लावला
त्याबद्दल सर्वांचे पंतप्रधान आवास योजने चे लाभार्थी प्रकाश पाटील नरवाडे, संतोष हुंबे, नाना कदम, विलास रामराव नरवाडे, नामदेव विश्वनाथ नरवाडे नारायण दळवी, जगदीश वंदे, नारायण भरवाडे, गजानन दलशिंगारे, गजानन कदम, विनायक पानपट्टे, अमोल देशमाने, कैलास वानखेडे, व इत्यादी लाभार्थ्यांनी या सर्वांचे मनस्वी आभार मानले या सकारात्मक भूमिकेबद्दल लाभार्थ्याच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल शासन, प्रशासन, नगरपंचायत, अधिकारी, कर्मचारी, यांचे ऋणी आहोत अशी भावना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
.jpg)
No comments:
Post a Comment