समाजसेवक पारस शेठ साकला यांना 2026 चा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर
वाळूज | दर्पन प्रतिनिधी वाळुंज महानगर प पांडुरंग गायकवाड
वाळूज येथील नामवंत समाजसेवक पारस शेठ साकला यांना सन 2026 चा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा हा पुरस्कार समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात येतो.
वाळूज गावचे रहिवासी असलेले पारस शेठ साखला हे स्वतः अपंग असूनही त्यांनी समाजसेवेलाच आपले जीवनकार्य मानले आहे. शारीरिक मर्यादा कधीही आड न येऊ देता त्यांनी गरिब, निराधार, अपंग, आजारी आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. “गरिबांची सेवा हेच अंतिम ध्येय” या तत्त्वावर ठाम राहून त्यांनी अनेकांना आधार दिला आहे.
समाजकार्यासाठी केव्हाही आग्रही असणारे पारस शेठ साखला हे मदतीची गरज भासली की तत्काळ धाव घेण्यासाठी ओळखले जातात. अन्नदान, औषधोपचार सहाय्य, आर्थिक मदत, जनजागृती तसेच आपत्कालीन मदतीच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
या पुरस्काराच्या घोषणेमुळे वाळूज परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिक, सामाजिक संस्था व मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मिळालेला हा सन्मान त्यांच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे.

No comments:
Post a Comment