राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराने अनुराग संजय बुजाडे सन्मानित !



प्रतिनिधी/ आशिष कोडापेगडचांदूर

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर (जि. बुलढाणा) येथे आयोजित भव्य सोहळ्यात, अनुराग बुजाडे यांना राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.

​मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्रालयाचे सहाय्यक माहिती आयुक्त निलेश तायडे होते, तर सोहळ्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले.

​अत्यंत चुरशीची निवड प्रक्रिया

या पुरस्कारासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रांतील सुमारे ९८० प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची कसून छाननी केल्यानंतर, समाजिक क्षेत्रातील विशेष योगदानासाठी अनुराग बुजाडे यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. एका छोट्या शहरातून येऊन सामाजिक विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बुजाडे यांच्या कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांनी केला.

​मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी व्यासपीठावर धनश्रीताई काटीकर पाटील, अशांत भाई वानखेडे, कारगिल योद्धा सुभेदार दिनेश तायडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.


No comments:

Post a Comment