धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान.
पत्रकार:- मोहन जाधव
धामोरी:- “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य, न्याय व जनहित जपण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे,” असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल धामोरीचे मुख्याध्यापक एस. टी.बागल यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात केले. कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधत स्थानिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजनाने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किरणकुमार आवारे, निवृत्ती शिंदे, दत्तात्रय घुले, काकासाहेब खर्डे, मोहन जाधव, नवनाथ उल्हारे व मुन्नाभाई शेख यांचा शाल, ग्रेटिंग कार्ड, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बागल सर पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात माहितीचा वेग वाढला असला तरी सत्यता, जबाबदारी व सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन व चिकित्सक विचारांची सवय लावावी. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी पत्रकारितेचे स्वरूप, समाजातील भूमिका व जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक जगदाळे एस. बी., उपशिक्षक गायकवाड बी. एम., जेजुरकर एस. एन., सौ. कातकडे जे. एस., सौ. गागरे बी. एस., निकम एम. एस., ठाकूर एस. एस., कडाळे एस. एन., सौ. पावरा एल. एस., घोडे एस. जी., श्रीमती जायभाये सी. आर., जुमडे एम. एम., माळोदे बी. जे., वरिष्ठ लिपिक गोसावी जी. एस., पूर्णवेळ ग्रंथपाल बर्फे डी. जी., प्रयोगशाळा सहाय्यक आहिरे एन. एस., उपशिक्षिका सोनवणे एम. बी., संगणक शिक्षिका कु. अंजली वाघ तसेच कर्मचारी सुनील तुंबारे मामा व सोनवणे मामा, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment