वाढदिवसा निमीत्त रक्तदान शिबीर आयोजित करुन वाढदिवस साजरा,
प्रतिनिधी गजानन चव्हाण
श्री आईबाबा बहुउद्देशिय संस्था सालतवाडा यांच्या वतीने श्री गजानन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरामध्ये महीला पुरुष,पत्रकार व पोलीस अधिकारी, कर्मचारी होमगार्ड सैनिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान करुन वाढदिवस साजरा केला,या कार्यक्रमाचे उदघाटक अजीत जाधव पो. नि. मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन, अध्यक्ष आमदार हरिषभाऊ पिंपळे व प्रमुख पाहुणे हर्षल साबळे नगराध्यक्ष न. पा मुर्तिजापुर, अशोकरावजी थोरात, adv. दिलीप नाईक, द्वारकाप्रसाद दुबे( माजी नगराध्यक्ष ) राजु इंगोले,कैलाश महाजन,ईब्राहीम घाणीवाला पंकज कांबे,रोहीत अव्वलवार,प्रज्ञा निलेश वानखडे, पुनम रवी माडकर, सोनल मुकेश काळबांडे,प्रभुदास महाराज सालतवाडा, मिराताई राजेंद बोंडे , अरविंद तायडे, डॉ.राम भिंगारे , प्रशांत शेलवंटे हे होते,रक्तदात्यांचा उत्साह पाहुन शहर पोलीस स्टेशनचे स.पो. नि. अनिलजी पवार सर यांनी रक्तदान करुन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला , मान्यवरानीं वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर घेणे म्हणजे समाजा साठी एक आदर्श निर्माण करणारा उपक्रम आहे व याचा फायदा सर्व सामान्यांना होईल कारण रक्तदान हे महादान आहे, आज या शिबीरामध्ये जेवढेही रक्तदान होईल हे रक्त दवाखान्यात असलेल्या गरीब गरजू पेशन्टला मिळेल, असेच कार्यक्रम साजरे करत चला असा संदेश दिला,ही संस्था नेहमी रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व ईतरही समाजपयोगी उपक्रम राबवित असते, या कार्यक्रमा मध्ये मराठी चित्रपट, लेखक, दिगदर्शक,मुकुंदराव नितोने सराची विशेष उपस्थिती लाभली, या कार्यक्रमाला गुरुवर्य देवके सर, विष्णु लोडम,रावसाहेब काबे, प्रा. गोवर्धन इंगोले , रणबावळे सर, रवी चौहान, डिंगाबर सदार,लखन मिलांदे,नितीन माडगूळकर,गजानन देशमुख,गोपालराव खंडारे, अरुण थोरात, प्रकाश खंडारे, सुनील खंडारे, महादेव क्षीरसागर, सुखदेव गवई,जय ग्याने,अनिल डाहेलकर, संदिप घाटे व अनेक मान्यवरानी,मित्रपरीवाराने आप्तजानानी हजेरी लावली,कार्यक्रमासाठी विलास वानखडे,गजानन चव्हाण, ईम्रानभाई,वैभव वानखडे, अक्षय दांडगे,कु.अंकिता खंडारे,रफीक शेख,मिलिंद सिरसाट,अक्षय वानखडे,मिलिंद इंगळे,रंजित सिरसाट,प्रियंका चव्हाण,मिराताई बोन्डे,श्रेयश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गजानन चव्हाण व कोषाध्यक्ष विलास वानखडे यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थिताचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment