विधी सेवा शासकीय शिबिर व शासकीय योजनांचा भव्य मेळावा




प्रतिनिधी. :-  गणेश ठाकरे लासलगाव 

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक, जिल्हा प्रशासन, नाशिक व तालुका विधी सेवा समिती, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे विधी सेवा शासकीय योजनांचे महाशिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे.


     या महाशिबिराचे उद्घाटन रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता माननीय न्यायमूर्ती श्री. सारंग व्ही कोतवाल, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, नाशिक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी माननीय न्यायमूर्ती श्री.जितेंद्र शा.जैन व माननीय न्यायमूर्ती श्री.अश्विन डी. भोबे, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, नाशिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


     कार्यक्रमास मा. श्री. एस. डी. जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.

हे महाशिबिर तहसील कार्यालय प्रांगण, निफाड (जि. नाशिक) येथे संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विधी सेवा शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक, आयुष प्रसाद भारतीय प्रशासकीय सेवा जिल्हाधिकारी नाशिक, श्री अ.अ.अ शेख जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त सत्र न्यायाधीश निफाड तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती निफाड, सुहास प्र भोसले सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.


. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक, जिल्हा प्रशासन, नाशिक व तालुका विधी सेवा समिती, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे विधी सेवा शासकीय योजनांचे महाशिबिर आयोजित करण्यात आले या महाशिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा.--  विशाल नाईकवाडे   तहसिलदार निफाड






No comments:

Post a Comment