महागावात श्रेयाच्या राजकारणाचा कळस!



कामे प्रशासनाची फोटो लोकप्रतिनिधींचे जनतेची फसवणूक थांबवा  भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष विवेक नरवाडेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल


महागाव  प्रतिनिधी अक्षय डोंगरे 

महागाव शहरात सध्या विकासापेक्षा श्रेय घेण्याच्या राजकारणाने कळस गाठला असून प्रशासनाच्या निधीतून व योजनांतून झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची अक्षरश चढाओढ सुरू आहे हा प्रकार म्हणजे जनतेची उघड फसवणूक असल्याची तीव्र टीका भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे यांनी केली आहे

नरवाडे म्हणाले की शहरातील घरपोच शुद्ध पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध करून देणे नाल्यातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट डासांची फवारणी रस्त्यांची दुरुस्ती कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट ही कोणाची कृपा नसून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची व नगरपंचायत प्रशासनाची कर्तव्ये आहेत ही कामे केल्यावर उपकार केल्यासारखे वागणे म्हणजे नागरिकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे

तसेच घरकुल योजना अपंग कल्याण निधी व इतर शासकीय योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे ही शासनाची प्रक्रिया आहे या निधीचे चेक लोकप्रतिनिधी स्वत च्या खिशातून देत नाहीत तरीही त्यावर फोटो झळकावून श्रेय घेण्याचा प्रकार लज्जास्पद आहे असा घणाघात नरवाडे यांनी केला

घरकुल निधीवरून गंभीर सवाल

घरकुल योजनेबाबत नरवाडे यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले

सात वर्षांपासून रखडलेला घरकुल निधी अखेर जमा झाला, याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे आले पण हा निधी यापूर्वी तब्बल तीन वेळा परत का गेला? त्या वेळी कोण झोपले होते? त्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? असा थेट सवाल त्यांनी सत्ताधारी व प्रशासनाला केला

स्वखर्चातून काम करा मगच श्रेय घ्या

जर श्रेयच घ्यायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी स्वत च्या खिशातून विकासकामे करून दाखवावीत असे आव्हान देत नरवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उदाहरण दिले

भाजपाने स्वखर्चातून महागाव शहरात स्वच्छता मोहीम राबवली आणि त्याचे श्रेय घेतले कारण ते काम जनतेच्या पैशातून नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून झाले असे त्यांनी ठामपणे सांगितले.

श्रेय नव्हे काम हवे शेवटी नरवाडे म्हणाले

महागावच्या जनतेला फोटोबाजी फलकबाजी व श्रेयाचे राजकारण नको आहे जनतेला वेळेवर पाणी स्वच्छता आरोग्य व सुविधा हव्या आहेत प्रशासनाच्या निधीतून झालेल्या कोणत्याही कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये अन्यथा जनता योग्य वेळी योग्य उत्तर देईल.

No comments:

Post a Comment