येणेगुर येथील शेळी मेंढी, जनावर खरेदी विक्री बाजार व भाजीपाला बाजारात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीची तसेच महिलांची घुसमट व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे




उमरगा,ता, प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी 


येणेगुर 12/01/2026 वार सोमवार गावातील भाजीपाला बाजारात शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना व तसेच महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना बाजारात खरेदी करणे कठीण झाले आहे, असे चित्र समोर आले आहे.

 ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील जनतेने वारंवार सांगून ही गावातील मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्येच व्यापारी व्यापार करत बसत आहेत त्या प्रवेशद्वाराच्या मध्ये बसल्यामुळे येण्या जाण्यासाठी अपुरी जागा राहत असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ महिलांना जाणवत आहे तसेच सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने जर महिलांच्या गळ्यातील अथवा इतर दागिने व रोख रक्कम चोरी गेल्यावर जबाबदार कोण 

खरेदीदार महिलांना होते असलेला त्रासाची माहिती

छेडछाड आणि अयोग्य वागणूक अनेक महिला खरेदीदारांना बाजारात अयोग्य स्पर्श सहन करावा लागतो कोणाकडे दाद मागायची वेळ महिलांना जाणवत आहे यामुळे ग्रामपंचायत सरपंच महिला असतानाही अशा गंभीर मागणीकडे दुर्लक्ष करण्याचे कारण समजतं नाही


 गावातील नागरिकांनी समस्या मांडले

1/येणेगुर येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो.भाजीपाला बाजार, व जिल्ह्यात सर्वात मोठी जनावराची बाजार , तसेच ,शेळी मेंढी बाजारासाठी आंध्र व तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यातील व आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक खरेदी विक्री बाजारासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. व गावात प्रवेश करण्यासाठी एकमेव बोगदा असून त्या बोगद्यात बेशिस्तपणे वाहने लावून त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे त्या मार्गावरून शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी महिला यांचा बोगद्याच वापर करावा लागतो त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला वारंवार सांगून देखील ग्रामपंचायत त्या ठिकाणी दखल घेत नाही एखाद्या चुकीची घटना घडल्यानंतर ग्रामपंचायत तिला जाग येईल का असा प्रश्न नागरिक कडून विचारला जात आहे. ग्रामपंचायतचे भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.असे मत मा. तालुका भाजपा सरचिटणीस सागर पाटील यांनी सांगितले 

2/गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी उमरगा अंणदुर जिल्हा परिषद कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय याच मुख्य रस्त्यावरून जात असतात व ग्रामपंचायतला वारंवार सांगूनही ग्रामपंचायत दखल घेत नाही गावचे सरपंच महिला असूनही महिलेच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष देत नाहीत असे मत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर उर्फ आप्पु हिप्परगे यांनी सांगितले ,


        संरपच यांना यासंदर्भात माहिती विचारले असता शेळी मेंढी बाजार व भाजीपाला बाजार याचा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव होतो व त्या लीलावधारकांना पत्राद्वारे कळविण्यात येईल व तसेच बोगद्यात वाहनं व वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होणार नाही व तसेच शेळी मेंढी बाजार मधील होणाऱ्या नागरिकांना त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करते व पोलीस प्रशासनास पत्राद्वारे कळविले जाईल व पुढच्या आठवड्यात नागरिकांना सुरक्षित बाबतीत व शाळेच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना व महिलांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल

नॅशनल हायवे ६५ नवीन रोड झाल्यामुळे सर्विस रोड आणि गावात येण्या जाण्यासाठी मार्ग म्हणून बोगदा करण्यात आला आहे पण बाजार दिवशी त्या बोगद्यात ही मोटरसायकली व वाहने व्यवस्थित न लावल्या कारणाने विद्यार्थी व विद्यार्थिनींना व शाळेच्या वाहनांना व महिला व इतर नागरिकांना होणारा त्रास व तसेच शेळी मेंढी बाजार सर्विस रोड वरच गाडी पार्किंग करत आहेत त्यासाठी गावात येणारे एसटी महामंडळ उमरगा कडे जाणारे वाहनासाठी मोठी कसरत करण्याची वेळ येत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनास विनंती कीबाजारात पोलीस प्रशासन व तसेच महिला सुरक्षा पथक नेमणूक केल्यास महिला सुरक्षित वाटतील या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी गावातील व परिसरातील नागरिकात चर्चा होत आहे.

No comments:

Post a Comment