निलेश ताजणेंनी स्वीकारला पदभार; उपाध्यक्षपदी काँग्रेसचे मेंढी
प्रतिनिधी : आशिष कोडापे / अनुराग बुजाडे
नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय मेंढी यांनी विजय मिळवला. संजय मेंढी यांना १२ मते मिळाली, तर भाजपचे सतीश बेतावार यांना ८ मते पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश ताजणे हे पीठासन अधिकारी म्हणून होते. स्वीकृत सदस्यपदी भाजपचे सतीश उपलेंचवार व काँग्रेसचे सचिन भोयर यांची वर्णी लागली.
तत्पूर्वी निलेश ताजणे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकीत ताजणे पॅनलचे पाच सदस्य, काँग्रेस-उद्धवसेनाचे सात, तर भाजपचे आठ सदस्य निवडून आल्याने नगरपरिषदेत त्रिशंकू स्थिती होती. उपाध्यक्ष निवडणुकीत नीलेश ताजणे यांच्या पॅनलने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने संजय मेंढी यांचा विजय झाला.
Labels:
राजकारण

No comments:
Post a Comment