विहीर मंजुरीसाठी 70 हजाराची लाच घेताना तरनळी ता. केज चा सरपंच एसीबीच्या जाळ्यात



केज. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या फाईलवर गट विकास अधिकारी व इतर सुह्या घेऊन कार्यारंभ मिळवून देण्यासाठी 70 हजाराची लाच स्वीकारताना तरनळीच्या सरपंचाला  लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले मंगळवारी सायंकाळी केज पंचायत समितीच्या पाठीमागे ही एका खोलीत धडक कारवाई करण्यात आली.या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे . महादेव प्रताप खेडकर (वय  35 रा तरनळी ता केज जिल्हा बीड)अशी अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे या प्रकरणातील तक्रारदार आणि तीन सहकाऱ्यांच्या शेत जमिनीत नरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीच्या प्रस्तावावर गट विकास अधिकारी आणि संबंधित कधीकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी खेडकर याने  प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांप्रमाणे एक लाख रुपयांची मागणी केली होती

या संदर्भात 23 डिसेंबर 2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती लाच लूज प्रतिबंध विभागाने 23 आणि 24 डिसेंबर रोजी पंचासह पडताळणी केली असता  सरपंच खेडकर यांनी तक्रार दाराकडून दहा हजार आणि उर्वरित चिकन कडून प्रत्येकी 20000 असा एकूण 70000 मग त्याचे निष्पन्न झाले 1 जानेवारी 2026 रोजी पहिली सापळा कारवाई करण्यात आली असता आरोपीने थेट रक्कम स्वीकारली नाही.

त्यानंतर 13 जानेवारी 2026 रोजी केज पंचायत समितीच्या पाठीमागील रूममध्ये आपला कार्यवाही करण्यात आली यावेळी तक्रार दाराकडून पंचासमक्ष 70 हजार रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद पोलीस निरीक्षक विजय हनुमंत वगने यानी दाखल केली असून पुढील तपास बीड एसीबी चे उपअधीक्षक सोपान चिटमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे करत आहेत

No comments:

Post a Comment