होमगार्ड सैनिक नागेश ठाकरेचा असाही प्रामाणिकपणा1 लाख किमतीचा मोबाईल केला परत.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
महानगरपालिका बंदोबस्त साठी खदान पोलीस स्टेशनला ड्युटी वर असणारे सैनिक नागेश ठाकरे सनद क्र. 460 व सैनिक विकास राठोड 1579 व सैनिक राजेश ढवळे 421 व दोन नागपूर महिला कॉनस्टेबल प्रशिक्षणनार्थी
हे विजयी उमेदवार यांचा रॅली सोबत ड्युटी वर होते सरकारी स्वच्छलय राजेश हार्डवेअर समोर सिंधी कॅम्प खदान अकोला या ठिकाणी रॅली मध्ये युसूफ अली या मुलाचा मोबाईल पडला असता तो मोबाईल सैनिक नागेश ठाकरे यांना रोडवर खाली पडलेला दिसला त्यांनी तो जवळ घेतला, व काही वेळाने मोबाईल वर फोन आला असता त्यानी त्याला ओळखिचे पुरावे घेऊन बोलावले व तो आला असता त्याची शहानिशा करून मोबाईल त्याच्या स्वाधीन केला आपला मोबाईल पाहून त्यांनी अकोला होमगार्ड चे विशेष आभार मानले व तुमच्या सारखे इमानदार होमगार्ड सैनिल आहेत म्हणून आम्ही आहोत असे उदगार काढले या साठी सैनिक नागेश ठाकरे यांचे व सोबतच्या सर्वांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे, आपण ज्या निष्काम सेवा करणारी होमगार्ड संघटना आहे त्याचे सदस्य आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असे नागेश ठाकरे आमच्या शी बोलतांना म्हणतं होते,

No comments:
Post a Comment