निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ! बांधकामात भ्रष्टाचाराचा संशय नगरसेवकांची थेट तक्रार
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जा हलगर्जीपणा आणि अंदाजपत्रकाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे रस्ते बांधकामाच्या नावाखाली निकृष्ट साहित्याचा वापर करून सार्वजनिक निधीचा अपव्यय केल्याचा संशय व्यक्त करत नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव यांच्याकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे
नगरसेवक सुरेश नरवाडे, जयश्री संजय नरवाडे यांच्यासह संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय कदम ते ससाणे यांच्या घरापर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून कामात आवश्यक सिमेंट व खडीचा वापर झालेला नाही रस्ता टाकताना केवळ गोटे टाकून त्यावर थातुरमातुर पद्धतीने सिमेंट टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे
विशेष म्हणजे हा रस्ता शाळकरी विद्यार्थी नागरिक व जड वाहनांच्या नियमित वाहतुकीसाठी वापरात असल्याने भविष्यात मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे प्रशासन आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळेच असे निकृष्ट काम झाल्याचा थेट आरोप नगरसेवकांनी केला आहे
अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम न करता नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे ही केवळ निष्काळजी नव्हे तर सार्वजनिक पैशांची लूट आहे असा संतप्त सूर नगरसेवकांनी व्यक्त केला
महागावातील रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment