त्रिमूर्ती ग्रामीण मुलांचे बी.एड. महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन श्रद्धापूर्वक साजरा



वार्ताहर : नवनाथ घावटे, नेवासा–

त्रिमूर्ती ग्रामीण मुलांचे बी.एड.महाविद्यालय,त्रिमूर्तीनगर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाळून करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्मिता गिरी/गोसावी यांनी केले.त्यांनी डॉ. आंबेडकरांचे सामाजिक,शैक्षणिक आणि संविधाननिर्मितीतील बहुआयामी योगदान प्रभावी शब्दांत उलगडले._

_विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकवर्गाने मनोगत सादर केले. प्रा.भास्कर पालवे,प्रा.गोरक्षनाथ सोनवणे आणि कॉलेजचेप्राचार्य प्रा.साळवे सर यांनी आपल्या भाषणात डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा आजच्या समाजातील संदर्भ,सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका,संविधानातील न्याय–समता–बंधुत्वाच्या मूल्यांची गरज यावर सखोल चिंतन मांडले.विद्यार्थ्यांनी आंबेडकरी विचारांवर आधारित मनोगते व्यक्त केली.

No comments:

Post a Comment