संतोष लॉ कॉलेज म्हसरुळ येथे 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्त अभिवादन
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संतोष लॉ कॉलेज म्हसरूळ नाशिक येथे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या निमित्त सुरुवातीला दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य अनुश्री उपासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळीयावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले, महामानवाची जीवनगाथा या विषयावर विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रज्ञा शेजवळ यांनी भिम गीत गायन करून आदरांजली वाहिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अनुश्री उपासे उपशिक्षिका प्रज्ञा शेजवळ,अरुण विसपुते, अतूल दामोदर ,दिपाली रिपोटे ,ऋषभ पगारे अर्चना शिंदे,सागर पाटील ,जाहिद शेख,अरुण विसपुते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली रिपोटे तर अर्चना शिंदे यांनी आभार व्यक्त केले

No comments:
Post a Comment