मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने च्या अंमलबजावणी साठी आ. विठ्ठलराव लंघे यांची विधानसभा हिवाळी अधिवेशन मध्ये लक्षवेधी प्रभावी :'आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग



दर्पण न्यूज :-नेवासा  प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील 

राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांना कायमचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे शिव पानंद रस्ता शेती रस्ता यावर असलेले अतिक्रमण व याबद्दल असलेले वाद यावर ...

शिवसेना आमदार लोकनेते श्री विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मांडला

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, आता शेतरस्ते शिव रस्ते खुले  करण्यासाठी तातडीनेअंमलबजावणी करावी

तहसीलदार पातळीवरच सर्व प्रश्न अंतिम असावेत निकाली काढावेत त्यावर अपील नको अशी लक्षवेधी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मांडली

मात्र, आता शेतीतील वाढते अतिक्रमण लक्षात घेता या शासन निर्णयामुळे रस्ते तयार केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत.

या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा असेही नमूद केले. राज्यातीलराज्यातील शेत व शिव रस्ते संबंधी असलेले अतिक्रमण व त्यावर असलेले वादाची निराकरण करणे व त्यासंबंधी मजबुतीकरण करणे या अशा आशयाची निवेदने श्री नाथाभाऊ शिंदे पाटील महाराष्ट्र राज्य शेत शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष सुरेगाव तालुका नेवासा यांनी नेवासा तालुक्यातील चळवळीचे १० कार्यकर्ते व शिरूर व पारनेर तालुक्यातील श्री शरद राव पवळे प्रणेते शिवपानंद रस्ता यांचे समवेत हिवाळी अधिवेशन दरम्यान विधानसभेचे आमदार सर्वश्री विठ्ठलराव लंघे पाटील, अकोला बाळापूरचे आमदार श्री भोईरामजी शिरसाट महसूल मंत्री नामदार  चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जलसंपदा मंत्री माननीय नामदार जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब व मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नागपूर येथे समक्ष दिली त्या अनुषंगाने नेवासाचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शेत रस्ता संबंधी लक्षवेधी प्रश्न विधानसभेत मांडला याबद्दल त्यांचे अधिक विशेष कौतुक होत आहे

अशी माहिती  महाराष्ट्र राज्य शेत रस्ता व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील सुरेगावकर यांनी दिली

योजनेची वैशिष्ट्ये१) अतिक्रमण हटवणार- गाव नकाशावरील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवली जातील.२) शुल्कात माफी- रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलिस बंदोबस्ताचे शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केले आहे.

३) रॉयल्टी नाही-रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी लागणारे गाळ, माती, मुरूम किंवा दगडासाठी कोणतीही रॉयल्टी लागणार नाही.४) वृक्षारोपण अनिवार्य-रस्त्याच्च्या दोन्ही बाजूंना 'बिहार पॅटर्न' किंवा मनरेगामधून वृक्षारोपण करणे बंधनकारक असेल.

No comments:

Post a Comment