प्रा. महेश बागडे ‘मानद डॉक्टरेट’ बहुमानाने सन्मानित
-- संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड :महाडच्या शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या साई छाया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच ओम साई इन्स्टिट्यूट, महाडचे संस्थापक डॉ. महेश बागडे यांना कोलकाता येथील अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण व संशोधन परिषद (AICTET) तर्फे ‘रिसर्च बेस्ड प्रोफेशनल मानद डॉक्टरेट’ (Professional Honorary Doctorate – Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. हा मान 30 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष समारंभात देण्यात आला.
डॉ. बागडे यांनी गेल्या 14 वर्षांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून महाड आणि परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांशी असलेला सकारात्मक संवाद यामुळे त्यांची ओळख एक उत्कृष्ट व समर्पित शिक्षक म्हणून झाली आहे.
ते सध्या शाहीन NEET अकॅडमी, महाडचे प्रमुख (Incharge) म्हणून कार्यरत असून NEET, JEE, CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यशाची नवीन शिखरे गाठली आहेत.मानद डॉक्टरेट मिळाल्याची बातमी समजताच महाडच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले. हा सन्मान त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा आणि समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी दिलेल्या योगदानाचा योग्य गौरव असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment