महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे कार्यकर्ते नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी रवाना
दर्पण न्यूज:-नेवासा प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे
सध्या ८ डिसेंबर 2025 पासून विदर्भाची राजधानी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता गाव तेथे समृद्धी या घोषणेप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता मिळावा यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी आदेश काढले जातात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही या बाबतची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालय पातळी वरून स्पष्टआदेश राज्यातील तहसील कार्यालयांना मिळावेत यासाठी या मागणीसाठी शेत रस्ता चळवळीचे कार्यकर्ते नेवासा येथून महाराष्ट्र राज्य शेत शिव पानंद
रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील श्री बाळासाहेब थोरात श्री मुरलीधर जरे श्री कानिफनाथ कदम रमेश भक्त जानकु रूपनर प्रशांत चौधरी रावसाहेब कडू पाटील व मिनीनाथ धाडगे व सुनील थोरात हे सर्वजण देवगड दत्त देवस्थान येथील दत्त मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे रवाना झालेले आहेत

No comments:
Post a Comment