मोहम्मद अयान, शेख रियाज यांचा असाही प्रामाणिकपणा
प्रतिनिधी गजानन चव्हाण
शुक्रवार मुर्तिजापूर चा बाजार असल्याने रस्त्याची वरझड,अशातच संध्याकाळी अदांजे सात वाजताच्या दरम्यान विकी विनोद मुगल रा.सोनाळा हातगांव या पोलिस भरतीची तयारी करणा-या युवकाची सर्व कागदपत्र असणारी फाईलची पिशवी बायपास ते उडानपुल दर्यापूर रोड वर कुठे तरी पडली,युवकांने नुकतेच संध्याकाळी पोलिस भरती साठी आनलाईन अर्ज करुन कागदपत्राची फाईल ची पिशवी मोटारसायकली च्या हँडल ला लटकून घरी जात असतांनी ,विद्युत वितरण आफीस मुर्तिजापुर च्या जवळपास पिशवीचा कसा तुटल्याने पिशवी खाली पडली,परंतु हि बाब त्यांच्या काही अंतरावर गेल्यावर लक्षात आली,मग ते वापस पिशवी शोधत येत असतांनी पिशवी मिळाली नाही, व ते नाईलाजाने मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ला पिशवी हरविल्याची तक्रार देण्यास गेले होते,परंतु ज्या रस्त्यातने ती पिशवी पडली त्याच रस्त्याने मोटार सायकल ने मोहम्मद अयान व शेख रियाज जात असतांनी त्यांना ती फाईलची पिशवी रस्त्यात सापडली,
या दोन्ही युवकांनी ती पिशवी पाहली व त्यांना वाटले कोण्या तरी भरतीची तयारी करणा-या मुलाची फाईल असणारी पिशवी आहे ती पिशवी घेऊन ते थेट मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन येथे आले व तेथे असणारे हेड कॉन्स्टेबल मंगेश विल्हेकर व होमगार्ड सैनीक गजानन चव्हाण व अरुण राऊत यांना ती फाईलची पिशवी दाखविली नंतर यांनी त्या पिशवी मधील फाईल पाहुन त्या मधील पत्ता ओळखुन त्याच गावचे गजानन चव्हाणचे मित्र मुगल यांना पिशवी बद्दल माहिती दिली,व नांव सांगुन ज्यांची कोणाची असेल त्यांनी त्यांना फोन करुन मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला बोलावले व हेड कॉन्स्टेबल मंगेश विल्हेकर,होमगार्ड सैनिक गजानन चव्हाण,अरूण राऊत यांच्या समक्ष ती फाईल ची पिशवी विकी मुगलच्या स्वाधीन केली,आजही या दुनीयेत माणुसकी जिवंत आहे यांचे या दोन्ही व्यक्तीने दर्शन घडवून आणले, नतंर मुगलने त्या दोघांना फोन करूण धन्यवाद दिले, मोहम्मद अयान,शेख रियाज यांच्या चांगल्या कार्यासाठी पोलिस कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी व सर्वाचा कौतुकांचा वर्षाव होत आहे,

No comments:
Post a Comment