नृसिंहवाडी -दत्त नामाच्या गजरात दत्त जयंती उत्साहात साजरी...
प्रतिनिधी - संतोष माने
नृसिंहवाडी - दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जय घोषात दत्त जयंती उत्साहात साजरी. आज पहाटे तीन वाजले पासून भाविक दत्त दर्शनासाठी पायी, सायकली,मोटारसायकल तसेच इतर वाहनांच्या सहायाने नृसिंहवाडी कडे प्रस्थान करीत होते. दत्त दर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक ट्रस्ट, मंडळांनी चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली तसेच दुपारी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतीचे या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य होते. श्री नृसिंहसरस्वतीनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती या मध्ये अनेक चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. श्री नृसिंह सरस्वती च्या पादुकांची पूजा केली जाते.
कृष्णा व पंचगंगेच्या प्रशस्त अशा घाटावर मद्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे.त्या मंदिराभोवती गोलाकार मंडप असून त्याला चार ही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत. आतील गाभाऱ्यात पादुकांची पूजा केली जाते.या गभर्याच्ये द्वार अतिशय लहान आहे. पादुका ज्या ठिकाणी आहेत त्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी त्यावर आजूबाजूला मयूर व जय- विजय आणि त्यांच्यावरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उमटवलेली आहे.
दत्त प्रभूंचे दुसरे अवतार महणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह सरस्वती च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्त भक्तामध्ये दत्त प्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.
पहाटे तीन पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत दत्त भक्तांचां जागर सुरू असतो. काकड आरती, पंचामृत, अभिषेक ,महापूजा पवमान पठण , धुपारती, दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम चालू असतो.

No comments:
Post a Comment