जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद नाशिकचे सीईओ ओमकार जी पवार यांचा अनोखा उपक्रम..



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नासिक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार जी पवार यांनी एक अनोखा उपक्रमामार्फत वेगळाच संदेश दिला श्री ओमकार पवार साहेब यांनी अचानक सर्व प्रशासकीय विभागांना प्रत्यक्ष भेट देत दिव्यांग कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कर्मचारी यांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान पवार यांनी प्रत्येक विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेतली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक त्या सुविधांसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दिव्यांग कर्मचारी हे आपल्या कार्यालयीन व्यवस्थेचा अविभाज्य भाग असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. दिव्यांग कर्मचाऱ्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या भेटीबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकारी हर्षदा बडगूजर, कार्यकारी अभियंता (ग्रापापू) गंगाधर निवडंगे, शिक्षणाधिकारी सरोज जगताप, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र चौधरी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment