सोनईत श्री बालाजी मंदिराचा 13 वर्धापनदिन भक्तिभावात साजरा



वार्ताहर:नवनाथ घावटे, 

नेवासा– सोनई येथील पुरातन श्री व्यंकटेश्वर बालाजी मंदिराचा तेरावा वर्धापनदिन यंदा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा झाला. पहाटे ५ ते ११ या वेळेत झालेल्या महाअभिषेकाने उत्सवाला उत्साहवर्धक सुरूवात झाली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ च्या जयघोषात दुपारी १२ वाजता मुख्य आरती संपन्न झाली व बालाजी महाराजांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. तेरा वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार बालाजी तरुण मंडळाच्या वडार बांधव तसेच श्री बालाजी भक्त परिवाराच्या प्रयत्नातून करण्यात आला होता. याच स्मृतीदिनानिमित्त यंदाच्या वर्धापनदिनात पुरोहित भानू स्वामी, कल्याण स्वामी व पवन सत्यनारायण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ, अभिषेक आणि महापूजा विधी पार पडले.

देवस्थानचे अध्यक्ष वसंत कुसळकर संदिप कुसळकर, नथुराम कुसळकर सुरेश कुसळकर सुरेश लष्कर एकनाथ कुसळकर यांनी संत-महंत, मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. पुणे येथील बालाजी ट्रस्टचे ज्ञानेश्वर भाटे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख, युवा नेते उदयन गडाख यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

या कार्यक्रमात वडार समाज बांधव, गावातील ज्येष्ठ-युवक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने श्रद्धाळू सहभागी झाले. अभिषेकानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा महाप्रसाद गौतम त्रिंबक कुसळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता. उत्सवाला वेंकीज ग्रुप पुणेचे चेअरमन भाटिया, देवकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक एस. बी. शेटे, किसन गडाख पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे ए पी आय विजय माळी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत वसंतराव कुसळकर, संदीप कुसळकर, राहुल कुसळकर, नथुराम कुसळकर, रावसाहेब कुसळकर, गणेश कुसळकर, सुरेश लष्कर, एकनाथ कुसळकर, लक्ष्मण कुसळकर रावसाहेब कुसळकर सर सुरेश कूसळकर भानुदास कुसळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले,

"मी प्रथमच श्री बालाजींच्या दर्शनासाठी आलो. या पवित्र जागेत आल्यावर मन अत्यंत प्रसन्न झाले. देवस्थानचा वर्धापन सोहळा अतिशय सुंदरतेने आणि शिस्तबद्धरीत्या पार पडत आहे. सोनई परिसरातील भक्तांचा मोठा प्रतिसाद पाहून आनंद झाला."

अशोका वडापावला आमदार विठ्ठल लंघे यांची भेट

सोनईची खास ओळख बनलेले अशोका वडापाव रेस्टॉरंट दरवर्षी १ जानेवारीला केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या भेटीने विशेष चर्चेत असते. ही परंपरा सुरू ठेवत यंदा सोनई भेटीदरम्यान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनीही अशोका वडापावचा आस्वाद घेतला. चव चाखल्यानंतर त्यांनी “वडापावची चव उत्कृष्ट आणि खास सोनईची ओळख आहे” असे कौतुक केले.

उत्सवाचा संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध आयोजनासह आणि मोठ्या आता माठात बालाजी तरुण मंडळाच्या वतीने पार पाडण्यात आला.

No comments:

Post a Comment