थेटाळ येथे १७ वर्षे तरुणाचा अज्ञात वाहनाने अपघाती मृत्यू..
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील मौजे थेटाळे शिवारात आज दुपारी २.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला.
याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी उगाव ता.निफाड येथील कु.अनिकेत गोरख पानगव्हाणे हा हिरो होंडा शाईन या बिना नंबरच्या मोटार सायकल वरून लासलगावकडून उगावकडे जात होता. यावेळी थेटाळे चौफुली नजीक त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक जोरात असल्याने डोक्यावरून चाक गेल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.उत्तम गोसावी करीत आहेत.

No comments:
Post a Comment