पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या बसला सातारा जिल्ह्यातील वाठार गावाजवळ अपघात, १२ विद्यार्थ्यांसह कर्मचारी जखमी, जखमींची यादी आली समोर...
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
स्वर्गीय बी.पी.पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक येथील इयत्ता ११ वी चे ५० विद्यार्थी शैक्षणिक सहलीवर मालवण येथे जाऊन परत येत होती. सदर बस (एम.एच. ०४ जी.पी. ०९२०) आज दिनांक २ डिसेंबर रोजी पहाटे ६.४५ वाजता सातारा जिल्ह्यातील कराडजवळ मौजे वाठार गावाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर रस्ता दुरुस्तीच्या कामातील नालीत कोसळली. या अपघातात कर्मचारी व विद्यार्थ्यांसह एकूण १२ जण जखमी झाले. बसचे चालक भारत संभाजी थेटे होते.
बस मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आव्हाड ओंकार गोरखनाथ, शेजवळ आदित्य लक्ष्मण, भालेराव सत्यम ज्ञानेश्वर, शिंदे सूरज संजय, मोरे चिन्मय विलास, संदे वेदांत विलास, रोहमारे कृष्णा विशाल, वाधवणे अंकित विठ्ठल, अहेर पार्थ संजय, वाघ यशराज योगेश, अहेर प्रज्वल दिगंबर, भुतडा आदित्य विजय, अहेर प्रणव योगेश, गागुंडे प्रसाद राजाराम, बवे प्रेम मुकेश, महाले यश चंद्रकांत, भामरे संकेत सुनिल, मालसाने आदित्य राजेंद्र, दाते कृष्णा किशोर, शेटे स्वरित अनंत, देशमुख अथर्व दिपक, लोकेश अनिल गाडे, सार्थक भाऊसाहेब, सोनावणे अनिकेत प्रविण, जाधव प्रणव योगेश, बनकर सार्थक राजेंद्र, जाधव यश रविंद्र, गायकवाड यश शरद, काळे सार्थक विनोद, जगताप संकेत हेमंत, पगार स्वयंम गणेश, जगताप सार्थक दत्तात्रय, थेटे श्रेयश किरण, खोडे सार्थक चंद्रकांत, वाघ ईश्वर प्रभाकर, मोगल साहिल किरण, चव्हाण उदय प्रशांत, मोरे अश्विन योगेश, गवळी सार्थक सुरेश, पाचोरकर ऋषिकेश विठ्ठल, गवळी यश संतोष, शेळके पियुष अनिल, जाधव सार्थक संतोष, शेळके संस्कार सतीश, कादबाने रोहित हिरामन, शिंदे जय नितीन, निखाडे अथर्व दत्तात्रय, उगले कृष्णा ज्ञानेश्वर, राठोड जगदीश नामदेव, वाणी ओम जितेंद्र यांचा समावेश होता.
यापैकी आहेर प्रज्वल दिगंबर, पाचोरकर ऋषिकेश विठ्ठल, सार्थक संजय चव्हाण, आदित्य लक्ष्मण शेजवळ, साहील किरण मोगल, पियुष काळे, वेदांत विलास शिंदे, कल्पना सोमनाथ गिरे, चिन्मय विलास मोरे, संगिता गोरख ढगे, भगवान विजय साळवे, सिकंदर बाबालाल शेख हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मलकापूर येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळास तसेच रुग्णालयात कराड (दक्षिण) विधानसभा सदस्य व कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश भोसले, उपविभागीय अधिकारी कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, तहसीलदार कराड यांनी भेट देऊन तातडीची मदत व आवश्यक उपाययोजना केल्या. दरम्यान, निफाड विधानसभा सदस्य दिलीप बनकर यांनीही जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. निफाडचे प्रांत शशिकांत मंगरूळे व तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनीही सतत संपर्क ठेऊन आवश्यक ती मदत केली.
अपघातग्रस्तांसाठी विशेष मदत कक्ष तहसील कार्यालय, कराड येथे सुरू करण्यात आला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२१६४–२२२२१२ आहे. अतिरिक्त मदतीसाठी : विजय कणसे, वैद्यकीय अधिकारी, कृष्णा हॉस्पिटल : ०२१६४–२४१५५५ ते ५८
बाबुराव राठोड, निवासी नायब तहसीलदार : ९४०३६६३२७१ महेश पाटील, मंडळाधिकारी मलकापूर : ९९२२९५५१५५ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती निफाडचे तहसीलदार मा.विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment