नगरपंचायत च्या निवडणुका पुढे ढकलल्या



अहिल्यानगर चार पालिकांसह अन्य पालिकांच्या १४ प्रभागांतील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने‌ दिलेल्या आदेशानुसार स्थगित केल्या आहेत.

दर्पण न्यूज:-नाथाभाऊ शिंदे पाटील 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळालीप्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार पालिकांसह अन्य पालिकांच्या १४ प्रभागांतील निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने‌ दिलेल्या आदेशानुसार स्थगित केल्या आहेत. आता या निवडणुका सुधारित आदेशानुसार होणार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान तर दि. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२ पैकी केवळ राहाता पालिकेची निवडणूकच पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध झाली.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाबद्दल आज दिवसभर संभ्रम होता, रात्री उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी दिलेल्या आदेशानुसार नगरपरिषदा व नगरपंचायतमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि. २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे. अशा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका ४ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नये. अशा प्रकारणात नगराध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या नगरपरिषदा व नगरपंचायतीची संपुर्ण निवडणूक स्थगित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या चार पालिकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती, परंतु निवडणुकीत काही ठिकाणी नगराध्यक्षांसह प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील दाखल केले होते. अशा ठिकाणी अपिलाचे निकाल मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे उमेदवारांना अर्ज माघारी साठी तीन दिवसांचा अलाव कालावधी मिळाला नाही त्यापूर्वीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असे नमूद करत निवडणूक आयोगाने अपील दाखल झालेल्या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलली आहे.

आता त्या निवडणुका सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे. जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या चार पालिकांसह अन्य ६ पालिकांच्या १४ प्रभागातील निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यात संगमनेरमधील ३, राहुरी १, श्रीगोंदा १, शेवगाव ३. जामखेड २, शिर्डी २, व श्रीरामपूर १ या पालिकांच्या प्रभागांचा समावेश आहे.

ज्या उमेदवारांच्या अपीलावर २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आदेश पारीत झाले असतील, त्या ठिकाणीच्या संबंधित सदस्यांच्या जागेसाठी तसेच नगराध्यक्षपदाबाबत निकाल असलेल्या नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निवडणुका नवीन कार्यक्रमानुसार होणार आहेत. जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, कोपरगाव व देवळाली या चार पालिकांच्या नगराध्यक्षसह सदस्य पदावर न्यायालयात अपील दाखल झाले होते. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. दि. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत, दि. ११ डिसेंबर६ निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढवणार्‍या अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केले जाईल. २० डिसेंबरला मतदान, तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


No comments:

Post a Comment