मनुष्याला सदैव समस्या असतात त्या समस्यां निवारणासाठी परमार्थ व देवाची भक्ती अहोरात्र करा: अनिल पाटील महाराज बार्शीकर
दर्पण न्यूज:- नाथाभाऊ शिंदे पाटील
सोनई, जीवनात प्रत्येकाला कायमच समस्या निर्माण होत असतात त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय करावे लागतात त्या सर्व उपायांमध्ये परमार्थ भक्ती हा सर्वोत्तम उपाय आहे असे मार्मिक उपदेश ह भ प अनिल महाराज बार्शीकर यांनी श्रीरामवाडी सोनई येथे कीर्तनातून प्रगट केले, संसार, व्यवहार, व्यवसाय आणि आध्यात्मिक कार्यात आपले कार्य करताना मनात निर्मळपणा व सेवाभाव ठेवणे आवश्यक आहे. माहेरपणात माया व गोडवा असल्याने तिकडे जशी ओढ असते तशीच ओढ वैकुंठाची ठेवताना तेथे जाण्यासाठी पुण्य कार्याचा ठेवा करावा लागतो, हे विसरू नये, असे विचारही आळंदी येथील जोग महाराज संस्थेचे विश्वस्त अनिल महाराज पाटील बार्शीकर यांनी किर्तनप्रसंगी व्यक्त केले.
श्रीरामवाडी येथील रहिवासी व सुलोचनाबाई बेल्हेकर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर यांच्या वस्तीवर आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. तांदळे महाराज वारकरी संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे, हंडीनिमगाव देवस्थानचे रमेशानंदगिरी महाराज, आवेराज महाराज, गणेश महाराज आरगडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, राम महाराज कोल्हे, पांडुरंग महाराज जाधव, सागर महाराज राऊत, रायभान महाराज बेल्हेकर, गोविंद महाराज निमसे, उपसभापती किशोरभाऊ जोजार,सभापती सौ सुनीताताई गडाख पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, प्रदीप चिंधे, शिवनारायण वाघे सर, काकासाहेब वाल्हेकर सर, श्री सागर कांडेकर सर, व गौरव निमसे, अभिषेक बेल्हेकर, पृथ्वीराज बेल्हेकर व भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश शेटे, सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य,कर्मचारी वर्ग व विद्यार्थी, व परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह.भ. प.अनिल पाटील महाराज म्हणाले, ज्यांना ज्यांना सुखाचा सुगंध मिळतो तो भोगलेल्या दुःखामुळे आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. दुःखाचा मोबदला सुख असले तरी या सुखात अहंकार बाळगू नका. असा धर्मपर उपदेश अनिल महाराज यांनी केला
यावेळी सुलोचनाताई बेल्हेकर शिक्षण संस्था भानसहिवरे या संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. रंजनाताई बेल्हेकर,संजीवनी ताई नानासाहेब खर्डे, श्री. रमेश पाटीलबा बेल्हेकर, अशोक पाटील बेल्हेकर यांच्या श्रीरामवाडी सोनई येथील बेल्हेकर वस्तीवर आयोजित कीर्तन कार्यक्रमात अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. डॉक्टर सुरेशराव बेल्हेकर, अशोक बेल्हेकर, रमेश राव बेल्हेकर परिवाराच्या वतीने संत, महंत व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
रमेश बेल्हेकर यांनी संतपूजन केले. गीता भवन वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment