निफाड पंचायत समिती सभागृह येथे व लासलगाव परिसर येथील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा



प्रतिनिधी : गणेश ठाकरे,लासलगांव 


निफाड पंचायत समिती येथे संविधान दिनाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. महेश बनकर गणपत दादा मोरे महाविद्यालय निफाड यांनी संविधान या विषयावर सविस्तर माहिती सांगितले या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे प्रशासनाधिकारी निवृत्ती बगड वि.अधिकारी प्रशांत बोरसे व पंचायत समिती कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी,अशा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सुपरवायझर मेघा इंगळे यांनी केले.

जैन प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

येथील जैन प्राथमिक शाळेमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधान पुस्तिकेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका लिनिता अहिरे यांच्या हस्ते तर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक प्रसाद शेळके यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले, संविधान शपथ घेतली तसेच संविधान दिनानिमित्त माहिती सांगितली. संविधान दिनाच्या घोषणा देऊन रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

भारतीय संविधानावर आधारित चित्रकला, रंगभरण स्पर्धा, निबंध लेखन, माहिती लेखन,प्रश्नमंजुषा, आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खैरनार यांनी केले.प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, खजिनदार अजय ब्रम्हेचा, जैन प्राथमिक शाळेचे अध्यक्ष महावीर चोपडा, संचालक मोहनलाल बरडिया सुनिल आब्बड, अमित जैन, अक्षय ब्रम्हेचा आदिंनी संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

नू.वि.प्र.मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा

लासलगाव येथील नूतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा तसेच भारतीय संविधानाच्या ग्रंथ पूजनाने झाली. कार्यक्रमात संविधानाची उद्देशिका वाचन, संविधान शपथ, भाषण, घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले. इ. ९ वी ची विद्यार्थिनी क्षमा ओसवाल, हीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, परी बांगर या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व विशद केले. तर शिक्षिका सौ वैशाली कासव यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिली. यावेळेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शीतल आचार्य, उपमुख्याध्यापिका सौ.मिनल होळकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. मंजू वाधवा, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होते. तसेच याच दिवशी संविधान गुणगौरव समितीतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेस देखील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. परीक्षेचे नियोजन शीलामोती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त आहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख सौ नीता जेजुरकर यांनी केले. माध्यमिक विभाग प्रमुख तुकाराम केदारे यांनी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. नूतन विद्या प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर सदस्य हसमुख भाई पटेल चंद्रशेखर होळकर, सचिन मालपाणी,योगेश पाटील. यांनी घेतलेल्या उपक्रमांबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.


 ग्रामपंचायत वेळापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमापूजन करून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी विविध भाषणे सादर केले संविधान उद्देशिका वाचन यावेळेस करण्यात आले. ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र गरुड, मधुकर गरुड, भाऊराव कदम रोषण नवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक प्रताप आढाव, आढाव मॅडम, शुभांगी शिंदे सोमेश्वर शिंदे, बिटी घुगे, नारायण शिंदे सूरज शिंदे उपस्थित होते


फ्लाईव्हिंग स्कूल लासलगाव येथे संविधान दिन साजरा 

फ्लाईव्हिंग स्कूल लासलगाव संविधान दिन साजरा करण्यात आला. चिमुकल्या मुलांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. केशव शिंदे, संतोष शिंदे कविता शिंदे वैशाली शिंदे मुख्याध्यापक प्रतिभा पाटील, गीतांजली आढाव, कांचन पवार व पानपाटील मॅडम उपस्थित होते.


श्री महावीर विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भारतीय संविधानाचे पूजन प्राचार्या पल्लवी चव्हाणके व पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन उपशिक्षक विजय कुंदे यांनी केले. विद्यालयाचे उपशिक्षक भगिरथ सोनवणे यांनी भारतीय संविधानाविषयी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक लक्ष्मण पवार व आभार प्रदर्शन उपशिक्षक अनिल कुंभार्डे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

        भारतीय संविधान दिनानिमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, संस्थेचे खजिनदार अजय ब्रम्हेचा, संचालक मोहनशेठ बरडिया, महावीर चोपडा, अमित जैन, सुनिल आब्बड व संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले तसेच 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment