फ्लाइंग विंग्स स्कूल लासलगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी..
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव येथील फ्लाईंग स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक संतोष शिंदे, अँड.केशव शिंदे, कविता शिंदे, वैशाली शिंदे मुख्याध्यापक शुभांगी पानपाटील व उपशिक्षक प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनपट विषयी माहिती प्रतिभा पाटील यांनी दिली. शुभांगी पानपाटील यांनी ज्योतिबा फुले स्थापन केलेला सत्यशोधक समाज व समाजकार्य यावर मत व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्हा महिलांना शिक्षण घेता आले असे कांचन पवार यांनी सांगितले. यावेळी अन्वी ठाकरे, श्रीशा मोगल,दुर्वा देशमुख,राघव देसले, केतकी जगताप,शरयू जगताप व स्वरा पाटील या बालकांनी भाषणाद्वारे महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले..

No comments:
Post a Comment