महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात संपन्न, विद्यार्थी-वैज्ञानिक संवाद ठरला अविस्मरणीय!
महाड : शिक्षण विभाग पंचायत समिती महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहोप्रे आणि महाड तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 25 व 26 नोव्हेंबर 2025 रोजी पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे कॅम्पस कोऑर्डीनेटर डॉ. अमोल तांगडे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले.
उद्घाटन सोहळ्यास शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी, प्रांत अधिकारी मा. पोपट ओमाशे, गटविकास अधिकारी मा. उदयसिंह साळुंखे, गटशिक्षणाधिकारी श्री. राजन सुर्वे, प्राचार्य डॉ. राहुल डुंबरे, प्राचार्य डॉ. मनोजकुमार मुंडे, यासिन पोशिलकर, प्रेमसागर मेस्त्री, उद्धव कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर आधारित प्रदर्शनात इयत्ता 6 ते 8 मध्ये 55 आणि इयत्ता 9 ते 12 मध्ये 39 प्रतिकृती सादर करण्यात आल्या. शाश्वत शेती, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता अशा विविध विषयांवरील मॉडेल्सला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या दोन दिवसांत डॉ. जयंत जोशी आणि डॉ. रविकांत आळतेकर यांनी बालवैज्ञानिकांशी संवाद साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. वैज्ञानिक संवाद, उत्तम नियोजन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे प्रदर्शन अविस्मरणीय ठरले. सूत्र संचालन प्रा. माया देसाई, मंगेश कंक यांनी तर आभार वि. गो. चिमणकर यांनी मानले.

No comments:
Post a Comment