एनडुरन्स स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ भारताला दैदिप्यमान यश
२ सुवर्ण आणि १ कांस्य पदकाची कमाई; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
कासारसाई (संत तुकाराम महाराज साखर कारखाना) येथील LXT स्केटिंग ग्राऊंडवर 21 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या एनडुरन्स स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताची कन्या कु.दुर्गा दिलीप गुंजाळ हिने झळाळती कामगिरी करत २ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले. अंडर-12 गटात प्रथम क्रमांक मिळवत दुर्गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची व गावाची मान उंचावली आहे.
या भव्य विश्वचषक स्पर्धेत १२ पेक्षा अधिक देशांतील ४५० हून अधिक स्केटर्स सहभागी झाले होते. केनिया, यूएई, नेपाळ, मलेशिया, मालदिव, सौदी अरेबिया, फिलिपिन्स, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, थायलंड, सेनेगल या देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
दुर्गाला पदक व प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साहाय्यक मंगेश चिवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच इंडुरन्स वर्ल्डचे अध्यक्ष योगेश कोरे, सचिव दशरथ बंड, सहसचिव सतीश सिंग व परमपूज्य स्वामी वासुदेवानंदगिरी बहुरूपी महाराज यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. दुर्गाच्या यशामागे विसा स्केटिंग अकॅडमीचे कोच शाम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या कामगिरीबद्दल अकॅडमी, जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच NVP कॉलेजचे प्राचार्य यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
दुर्गा लासलगावात परतताच गावकरी आणि अनाथ आश्रमातील दुर्गाचे भव्य स्वागत करण्यात आले. आपल्या मुलीच्या या अद्वितीय यशाबद्दल तिची आई सौ. संगीता दिलीप गुंजाळ यांनी अपार आनंद व्यक्त केला व गुरु शाम चौधरी सरांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments:
Post a Comment