मरळगोई खुर्द येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक; ७ लाखांचे नुकसान



प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव 


 मरळगोई खुर्द येथील सुभाष विश्वनाथ घुगे यांच्या गट नंबर १७९ मधील घराला अचानक आग लागून मोठी आर्थिक हानी झाली. कांदा विक्रीतून आलेली व नवीन घर बांधणीसाठी जमा केलेली ३ लाख रुपये रोख रक्कम, तसेच पाच तोळे सोने, संसारोपयोगी साहित्य, शालेय साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीनंतर एकूण ७ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

    घुगे कुटुंब कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना घरातून अचानक उठलेल्या आगीने सर्वच साहित्य भस्मसात केले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून गेले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी गोंदेगाव सजेचे ग्राम महसूल अधिकारी कमलेश पाटील यांनी पंचनामा करून अहवाल निफाडचे तहसीलदार मा. विशाल नाईकवाडे यांना सादर केला आहे. घुगे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसल्याने शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment