नेवासा फाट्याचे नामकरण 'ज्ञानेश्वरनगर' करा :ह. भ. प. देवगड दत्त पिठाचे गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज




दर्पण न्यूज नाथाभाऊ  शिंदे 

नेवासा प्रतिनिधी 

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे आता मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झालेले असून ही कृषी व इतर मालाची मोठी बाजारपेठ झाली असून नेवासा फाट्याचे "ज्ञानेश्वरनगर" असे नामकरण केले जावे, अशी अपेक्षा श्रीक्षेत्र देवगडचे महंत ह भ प भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

नेवासा फाटा येथील नुकत्याच एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाराज म्हणाले, "फाटा "संकल्पना म्हणजे छोटीशी टपरी, वस्ती. परंतू तसे आता नेवासा फाटा हे राहिलेले नाही त्यात शहरीकरणाची भर पडली आहे. मोठ मोठाले बिल्डिंग व व्यवसाय या ठिकाणी विस्तारित झाले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुण्यवंत झाली आहे त्यामुळे नेवासा फाट्याचे "ज्ञानेश्वरनगर "असे नामकरण व्हावे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला संचालक शिवाजीराव भुसारी, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे, अॅड. वसंतराव नवले, काकासाहेब गायके, डॉ. मुकुंद हारदे, नंदकुमार पाटील, अॅड. रिंधे, प्राचार्य मालोजीराव भुसारी, दिनकरराव हारदे व नेवासा फाटा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment