लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा अधीक्षकांच्या हस्ते गणपती उत्सव स्पर्धाचे पुरस्कार वितरण ..



 प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

लासलगाव पोलिस ठाणे अंकित उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक मा. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते, पोलिस उपअधिक्षक मा.कांतीलाल पाटील व लासलगावचे सहा.पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

     लासलगाव गणेशोत्सव स्पर्धा प्रथम क्रमांक क्रांती मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक शिवसूर्या प्रतिष्ठान, तृतीय क्रमांक राजमद्रा मित्र मंडळ व संत नामदेव मित्र मंडळ विभागुन. विंचूर गणेशोत्सव स्पर्धा प्रथम क्रमांक बजरंग मित्र मंडळ, द्वितीय शिवाजी चौक मित्र मंडळ, तृतीय आझाद मित्र मंडळ तर ग्रामीण मंडळातपहिले बक्षीस वाकदचा राजा अष्टविनायक वाकद, दुसरे बक्षीस सिद्दी विनायक मित्र मंडळ, जैन मंदिर गोंदेगाव तर तिसरे बक्षीसबाप्पा मित्र मंडळ, इंदिरानगर, देवगाव यांना प्राप्त झाले आहे. किरण नवले, गोविंद शिरसाठ, श्रीकांत जोशी, गणेश कमोदकर, प्रसाद फाफाळे, सनी साबळे मंडळाच्या या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी बक्षीस स्वीकारले. 

     सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन, संस्कृती, राज्यातील गडकिल्ले संवर्धन व जतन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळाविषयी जनजागृती, सामाजिक उपक्रम, पर्यावरण पूरक मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट, ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, पारंपरिक व देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यांचा गुण देतांना विचार करण्यात आला.पत्रकार शेखर देसाई, डॉ.शैलेंद्र काळे, डॉ.श्रीकांत आवारे, पत्रकार डी.बी.काद्री, किशोर पाटील, मनोहर बोचरे, किरण आवारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment