पोलीस बॉईज संघटनेतर्फे शहीदांना भावपूर्ण आदरांजली

 


तालुका प्रतिनिधी गजानन चव्हाण

मुर्तिजापूर : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, होमगार्ड व निरपराध नागरिकांच्या अमर शौर्यस्मृतींना सलाम करत पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुलभैय्या दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, खुपिया शाखेचे  विजय साबळे, लक्ष्मण लोखंडे, जिवन अंभोरे, ट्रॅफिक विभागाचे विनोद कुमरे, हरिदास सोळंके, पंढरीनाथ पोले उपस्थित होते.

पत्रकार राजु मोहोड, श्याम राजे, प्रतिक कुहेकर, भैय्यासाहेब तायडे,माय युवा भारत अकोला समन्वयक  विलास वानखडे, श्री आईबाबा बहुउद्देशिय संस्था सालतवाडाचे गजानन चव्हाण, वैभव वानखडे,शंकर रूमाले,नाजुक इंगळे,आशितोष भेले, यांनीही उपस्थिती दर्शवून शहीदांना भावपूर्ण अभिवादन केले.

पोलीस बॉईज संघटनेतर्फे तालुका अध्यक्ष संदीप घाटे, उपाध्यक्ष पवन बैतुल्य, शहर अध्यक्ष शुभम जयस्वाल, पवन गोसावी, साहिल वाघमारे, परवेज गजलवार, आदेश इंगळे, अंतरिक्ष तायडे, यश खांडेकर, आशिष वानखडे, मानव दहातोंडे, गौरव ढोणे, प्रवीण वानखडे, पवन पाटील, विलास आटोटे, उत्कर्ष सळेदार,श्रेयश चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमात २६/११चा काळीज पिळवटून टाकणारा दहशतवादी हल्ला, त्यातून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे अमर योगदान आणि देशाच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

शहरातील पोलीस अधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था आणि पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष गांभीर्य लाभले. देशसेवेतील शहीदांचे बलिदान हे प्रेरणादायी असून त्यांची कृतज्ञतेने आठवण ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.


No comments:

Post a Comment