महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारीनी संपन्न



राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या झेंड्याखाली सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभाग घेणार राज्य कार्यकारणी मध्ये एक मताने ठराव संमत - राजन कोरगावकर राज्य सरचिटणीस.

खुलताबाद -महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारणी सभा सातारा सोनगाव फाटा सप्तपदी मंगल कार्यालय येथे दिनांक 27 जुलै 2025 रोजी संपन्न झाली.सप्टेंबर महिन्यात राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीने होणारे जे आंदोलन आहे त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा ठराव आजच्या झालेल्या कार्यकारिणी मध्ये घेण्यात आला असून संघटना याबाबत मार्गदर्शक सूचना देईल.

     15 मार्च 2024 ची जाचक संचमान्यता रद्द करावी. संचमान्यता 31 जुलैला, न करता 30 सप्टेंबर प्रमाणेच करावी. आधार कार्ड आधारित संचमान्यता नको असून पटसंखेने झालेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे संचमान्यता करावी आणि त्या नुसारच बदल्या व्हाव्यात तसेच बी एल ओ  प्रत्यक्ष निवडणूक काम वगळून आहे त्यामुळे या कामासाठी शिक्षकांची होणारी नेमणूक, निकृष्ट पोषण आहार आणि शिक्षकांच्या अडथळे वाढवणारे पोषणाचे नवीन धोरण, पदवीधर वेतन श्रेणीतील त्रुटी , वरिष्ठ श्रेणी,निवड श्रेणी , केंद्रप्रमुख पद भरती बाबत निघालेली अधिसूचना, आणि कोर्टामध्ये संच मान्यता तसेच बदल्या  संदर्भात चालू असलेल्या केसेस अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली.तसेच  शाळांचे स्टक्चर ऑडीट करुन घेऊनच नविन वर्ग खोल्या बांधकाम करण्यात याव्यात.

     पदवीधर वेतनश्रेणीचा प्रश्न अभ्यासपूर्वक मा. खुल्लर समिती समोर शिक्षक समितीने मांडला त्यामुळेच वेतन ञृटी दूर झाली, वित्त विभागाचा आदेश निघाला. मात्र शालेय शिक्षण चा आदेश न निघाल्यामुळे काही जिल्हे त्रुटी दूर करण्यास तयार होत नसल्यामुळे त्याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण ला तात्काळ देऊन सर्वांना प्रश्न सोडवण्यासाठी आदेश काढून घेण्यासाठी आग्रही राहील. बी एल ओ  कामाबाबत स्पष्ट जीआर काढण्या संदर्भात पत्रव्यवहार केला जाईल. जानेवारी 25 ते जुलै 25 पर्यंत विविध प्रकारची 92 प्रकारचा पत्रव्यवहार  शिक्षक समितीने केला असून त्याचा पाठपुरावा चालू आहे असे राज्याध्यक्ष विजयजी कोंबे यांनी स्पष्ट केले 

    राजन सावंत, प्रमोद तौडकर, सुरेश पवार,लीलाधर ठाकरे, सुधाकर सावंत, सुनील वाघ दिलीप महाडिक ,नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, संतोष पावणे,विजय येलवे, विशाल कणसे, जयश्री कदम, तुकाराम पाटील असे अनेक पदाधिकारी यांनी विविध प्रश्ना  संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. 

  शेवटी राज्य नेते उदयजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.या सभेला राज्याध्यक्ष विजयजी कोंबे, राज्य नेते उदयजी शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राजीव उपाध्यक्ष विलास कंटेकुरे, आनंदा कांदळकर, राजन सावंत, कार्याध्यक्ष सयाजी पाटील, कोषाध्यक्ष नंदूची होळकर ,राज्य सल्लागार माळवतकर पाटील, सुरेश पाटील,किशोर पाटील, सतीश सांगळे, राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे, नपा मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, दादा जांभवडेकर, सचिन मदने, अर्जुन पाटील, उमेश देसाई, श्रीकांत देवरे आदी विविध पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस मोठ्या संख्येने उपस्थित होते असे शिक्षक समितीचेमराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी  यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment