अवघड क्षेत्राच्या सेवाजेष्ठता यादीचा सावळा गोंधळ
खुलताबाद प्रतिनिधी दि.२९:
जि. प.शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या सध्या सुरू असुन , आतापर्यत संवर्ग १ व संवर्ग २ च्या बदल्याची प्रक्रिया पुर्ण झालेली असुन , दि २८ जुलै पासून संवर्ग ३ म्हणजेच अवघड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची बदली साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालु असुन , त्या करिता बदली पोर्टवर जी संवर्ग ३ ची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करण्यात आली आहे , ती शासन निर्णयानुसार नसुन यादी मध्ये अवघड क्षेत्रातील उपस्थिती दिनांक नुसार नाही , अवघड क्षेत्रात जे शिक्षक अवघड क्षेत्रात सेवा कमी झालेली असतानाही ज्यांची सेवा जास्त झालेली आहे
, त्यापुर्वी आहेत , त्यामुळे संवर्ग ३ म्हणजेच अवघड क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या सेवा जेष्ठ यादी चा गोंधळ मिटविल्या शिवाय संवर्ग ३ म्हणजेच अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यांची यादी प्रकाशित करू नय असे निवेदन शिक्षणाधिकारी यास शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, शामभाऊ राजपुत , कडुबा साळवे , विष्णु भंडारे , गजानन वरकड, के डी मगर,बबन चव्हाण, सतिश कोळी यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment