रोहित गणेश सुवर्णकार यांची महावितरण कंपनीत विद्युत साहेब पदावर निवड अटकळी गावचे नाव उज्वल.
गणेश कदम. ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
अटकळी (ता. बिलोली) : अटकळी येथील रोहित गणेश सुवर्णकार यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहायक या पदावर नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. रोहित यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अटकळी येथूनच झाले असून, त्यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेत डिप्लोमा पूर्ण केला आहे. महावितरण कंपनीच्या भरती प्रक्रियेत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून हे यश संपादन केले आहे. गावातील तरुणांसाठी त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment