पचखेडीचा खरा स्वच्छता दूत – ‘भैय्या समर्थ’



स्वप्नील खानोरकर पचखेडी 

 पैशांचा विचार न करता गावासाठी प्रामाणिकपणे काम करणारे ‘भैय्या समर्थ’ हे पचखेडीचे खरे स्वच्छता दूत मानले जातात. ग्रामपंचायतीची कचरा गाडी हाकत ते घराघरांतून कचरा जमा करतात. कुठे मृत प्राणी आढळल्यास त्याची विल्हेवाट लावण्याचे जबाबदारीचे कामही ते न तक्रार करता पार पाडतात.

कार्यक्रमानंतरची स्वच्छता असो, शाळा व सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल असो की नागरिकांनी दिलेले छोटे काम असो – भैय्या ते स्वतःच्या घरच्या कामासारखे करतात. कमी पगार असूनही कर्तव्याशी तडजोड न करता ते आपले काम मनापासून करतात.

“स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा नारा भैय्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे. गावातील रस्ते, शाळा आणि शौचालयांतून दरवळणारी स्वच्छतेची जाणीव हा त्यांच्या मेहनतीचा ठसा आहे. भैय्या समर्थ यांच्यामुळेच पचखेडी गावाचे नाव खऱ्या अर्थाने स्वच्छतेसाठी ओळखले जात आहे.

No comments:

Post a Comment