काष्टीमध्ये लोकसहभागातून संत सेना महाराजांचे भव्य मंदिर उभारणी



श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी:- अशोक राहिंज

काष्टी : लोकसहभागातून काष्टीत श्रीसंत सेना महाराजांचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीतून दहा लाखांचा निधी दिला. या मंदिरात नुकतीच सेना महाराजांच्या मूर्तीची बबनराव पाचपुते व इम्रानभाई शेख यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी अध्यात्माचा जागर करण्यात आला.

         पाचपुते म्हणाले, की काष्टीतील नाभिक समाजाची इच्छा होती, की गावात संत सेना महाराजांचे मंदिर उभे राहावे. ती इच्छा आज पूर्ण झाली. संत सेना महाराजांच्या मूर्तीसाठी ठाकरे सेनेचे मुंबईतील कार्यकर्ते इम्रानभाई शेख यांनी योगदान दिले, ही मोठी बाब आहे.

           यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे लाडके आ.विक्रम(दादा) पाचपुते, ठाकरेसेनेचे कार्यकर्ते इम्रान शेख, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, महेश्वर पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय गावडे, साई सेवा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाचपुते, काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते, खुलेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सुनील दरेकर, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन आबा कोलटकर लक्ष्मण अण्णा नलगे कृषी बाजार समितीचे संचालक ,काष्टी नाभिक संघटनेचे अध्यक्ष आप्पा रंधवे,चंदू पाचपुते, उपसरपंच सोमनाथ टिमुणे, सर्व काष्टीतील नाभिक संघटना ग्रामस्थ व गावकरी वर्ग सर्वजण कार्यक्रमाला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment