स्काऊट गाईड दीक्षांत विधी संपन्न
संतोष साळुंके नाशिक प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली , सी डी ओ मेरी हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक मधुकर पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता 6 वी च्या विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईड दीक्षांत विधी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या स्काऊट गाईड विभागाच्या वतीने संतोष देवांग, सुरेंद्र साबळे , रसिका कुलकर्णी, तोषणा ठाकूर, मधुकर हिंडे यांनी केले होते . प्रमुख पाहुणे मधुकर पगारे यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीची माहिती दिली व विद्यार्थ्यांना दीक्षा दिली. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे,उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर,ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, मिनाक्षी महाले,स्काऊटर मधुकर हिंडे, केशव बोडके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याना स्काऊट गाईड ची दीक्षा देण्यात आली . स्काऊटर मधुकर हिंडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सुरेंद्र साबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्काऊट गाईड विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच दीक्षांत विधी चे महत्व विद्यार्थ्याना सांगण्यात आले . संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे , मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमास शुभेच्या दिल्या.
या प्रसंगी शाळेतील सर्व स्काऊटर व गाईडर, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment