माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे ७८ वा स्वातंत्र्यदिनी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण
संतोष साळुंके नाशिक प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे 79वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, भारतीय वायू सेनेचे सेवानिवृत अधिकारी हर्षल खर्डे, पा.शि.संघ उपाध्यक्षा योगिनी सासे, माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके, उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप , शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, जेष्ठ शिक्षिका सुहासिनी जोशी, मंगला मुसळे, सुनीता मोगल ,शालेय पंतप्रधान रूद्र घरटे ,माजी विद्यार्थी हे उपस्थित होते.
मान्यवरांच्याहस्ते ध्वारोहण करण्यात आले. संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी , पालक , माजी विद्यार्थी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी ध्वज निष्ठेची तर पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी तंबाखू निर्मूलन, तर पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ यांनी ज्येष्ठ नागरिक सुरक्षितता याबाबत शपथ विद्यार्थ्याना दिली. याप्रसंगी शालेय विद्यार्थी दिक्षा पाटील, हर्षदा सोनवणे यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली. याप्रसंगी क्रीडा शिक्षक मंगला मुसळे, कैलास पाटील, संदीप भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कवायत विद्यार्थांनी सादर केले.तसेच मेघा तायडे,स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. मृण्मयी घैसास, रसिका कुलकर्णी , अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंच व विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत सादर केले . मान्यवरांच्याहस्ते इ 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले .त्याचे निवेदन मिनाक्षी मारवाडी यांनी केले . याप्रसंगी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यालयात निबंध, वत्कृत्व, चित्रकला, शैक्षणिक साधन, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचे निवेदन निरुपमा ठाकूर यांनी केले . विद्यार्थी क्रांतिकारक , स्वातंत्र सैनिक यांची वेशभूषा करून आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संदीप भगरे यांनी केले.
हर घर तिरंगा या उप्रमाअंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले.सिडको परिसरात रॅली काढण्यात आली. पालकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पालक , माजी विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment